मी कशी वाटते तुला ?
मी कशी वाटते तुला ? तिने अचूक खडा मारला
प्रश्न साधा सरळ, पण माझा अभिमन्यु झाला
हे काय वेड्यासारख, मी प्रश्न टाळउन पाहिला
तिच्या मनात एकच, आज बरा हा तावडीत भेटला
चल निघू आपण, बघ दिवस पण मावळला
थाम्बुया ना थोडावेळ, तिने पुन्हा गळ टाकला
सुटका नाही आज म्हणत, तिने हात माझा पकडला
प्रेम म्हणावे की पाश हे, आता तुम्हीच काय ते बोला
काय उपमा देऊ अन, काय सांगू आता हिला
माधुरी-ऐश्वर्या म्हणू की, म्हणू सरळ मधुबाला
फूल म्हणू की फुलामधला, गंध म्हणू निराळआ
स्वप्न म्हणू की वास्तवाचा, भास् तो आगाळआ
थोड चढवून सांगू की, सरळ स्पष्टच सांगू तिला
बाई ग प्रेम-बिम समजल नाही अजुन, थोडा वेळ दे मला
नाहीतर नकोच ही दुनियादारी, उगीच व्हायची शाळआ
आवडल तर ठीक, नाहीतर फसायाचा बेत सगळआ
अरे सांग ना..., पुन्हा तिने तोच राग आळवला
आता काहीतरी बोलायचे ठरवत, मीही शब्द उच्चारला
सांगणार होतो तितक्यात तिचा फोन अचानक वाजला
घरचा नंबर बघताच तिने, रुमालाने घाम टिपला
निघते मी आता म्हणत तिने, हात माझा सैल केला
सुटलो बाबा एकदाच म्हणत, मी दीर्घ उसासा सोडला
प्रश्न होता साधा सरळ, पण मी वेढ्यात अडकलेला
एक दिवसासाठी का होइना, अभिमन्यु तेव्हा सुटलेला
खरं प्रेम एकदाच होतं,ते कधीही विसरता येत नाही!!शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ,अनेकांवर पसरता येत नाही....
माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............
हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...
गुरुवार, २४ मार्च, २०११
.....क्षणात ब्रम्हांड आठवलं
घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"प्रेम करतो
तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला
क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग
नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला
नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास
झाला.
अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती
फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला
तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं
म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या
ओल्या सुरांचा भास झाला.
मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार
करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके
दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"जमलं का
गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं
त्याने तिला एकदाचे विचारलं
"प्रेम करतो
तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला
क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग
नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला
नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास
झाला.
अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती
फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला
तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं
म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या
ओल्या सुरांचा भास झाला.
मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार
करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके
दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"जमलं का
गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)