हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरून सुद्धा जातो आणि नंतर कधी तरी जेंव्हा आपण जुन्या आठवणी चाळत असतो तेंव्हा ते अचानक आपणच शेयर केलेल, आपल्यालाच नविन विचार वाटतो. जेंव्हा हा माझा कट्टा लिहायला सुरु केला तेंव्हा असच चांगले चांगले विचार शेयर केले, जे भेटत गेले या मायाजाळात. तेंव्हा ते वय ही नव्हत काही लिहिण्याच आणि तेवढे काही अनुभवही. आज स्वतः काहीतरी लिहिण्याची प्रगल्भता आली आहे, असं वाटत म्हणून जमेल तेंव्हा आणि जमेल तस लिहाव म्हणतो.........दर दिवशी काही ना काही विचार मनात येऊन जातात, बरेच अनुभव येतात........तेच माझ्या कट्ट्यावर लिहावे म्हणतो.........