माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

Ek Tarfi Prem

बुधवार, २ मे, २०१२

प्रेम मनातच असणे पुरेसे नसते...!!
जेव्हा मी १५ आणि तू ११
वर्षाची होतीस...मी म्हणलो...
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू
विचारलस "ते काय असत ..?"
... आठवतंय..? मी २५
व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर
खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर
नाही ना सोडणार..?"आणि अलगद
माज्या मिठीत विरघळलीस...!!
३५
व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उश
िरा घरी आलो..तू आणि मी सोबतच डिनर
घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love
you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ
टेकवत म्हणालीस..
" I know that.." पण
सकाळी मुलांचा पेपर आहे...उशीर
नको व्हायला आता जास्त...आता झोपू
यात लवकर...!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे
पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच
म्हणालो..."I love you very much
"
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे
आगी २० वर्ष आधी पासून माहित आहे.."
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून
गेलीस...!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू
घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ
करून म्हणालो...तू मला खूप
आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम
आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते
ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित
अरेंज झालाय ना..?"
मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर
बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत
होतीस..नातवासाठ ी..मी म्हणालो"मा
झ तुझ्यावर अजून हि तितकाच प्रेम
आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."मा झ पण तुझ्यावर
आजही तितकच प्रेम आहे जितक
तुला होकार देताना होत.."
माझ्या हातातील
तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण
भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत
होते ...कारण आज इतक्या वर्षांनी...तू
स्वतः म्हणाली होती...तू
सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर
प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच
नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ
असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे
सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम
आहे तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर
आहे....म्हणून जेव्हा पण संधी मिळेल
सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम
करतात ते...

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

- सुरेश भट

गुरुवार, २४ मार्च, २०११

मी कशी वाटते तुला ?

मी कशी वाटते तुला ?


मी कशी वाटते तुला ? तिने अचूक खडा मारला

प्रश्न साधा सरळ, पण माझा अभिमन्यु झाला


हे काय वेड्यासारख, मी प्रश्न टाळउन पाहिला

तिच्या मनात एकच, आज बरा हा तावडीत भेटला


चल निघू आपण, बघ दिवस पण मावळला

थाम्बुया ना थोडावेळ, तिने पुन्हा गळ टाकला


सुटका नाही आज म्हणत, तिने हात माझा पकडला

प्रेम म्हणावे की पाश हे, आता तुम्हीच काय ते बोला


काय उपमा देऊ अन, काय सांगू आता हिला

माधुरी-ऐश्वर्या म्हणू की, म्हणू सरळ मधुबाला


फूल म्हणू की फुलामधला, गंध म्हणू निराळआ

स्वप्न म्हणू की वास्तवाचा, भास् तो आगाळआ


थोड चढवून सांगू की, सरळ स्पष्टच सांगू तिला

बाई ग प्रेम-बिम समजल नाही अजुन, थोडा वेळ दे मला


नाहीतर नकोच ही दुनियादारी, उगीच व्हायची शाळआ

आवडल तर ठीक, नाहीतर फसायाचा बेत सगळआ


अरे सांग ना..., पुन्हा तिने तोच राग आळवला

आता काहीतरी बोलायचे ठरवत, मीही शब्द उच्चारला


सांगणार होतो तितक्यात तिचा फोन अचानक वाजला

घरचा नंबर बघताच तिने, रुमालाने घाम टिपला


निघते मी आता म्हणत तिने, हात माझा सैल केला

सुटलो बाबा एकदाच म्हणत, मी दीर्घ उसासा सोडला


प्रश्न होता साधा सरळ, पण मी वेढ्यात अडकलेला

एक दिवसासाठी का होइना, अभिमन्यु तेव्हा सुटलेला

.....क्षणात ब्रम्हांड आठवलं

घाबरत घाबरत शब्द जुळवत


त्याने तिला एकदाचे विचारलं

"प्रेम करतो

तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"

तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं

त्याला

क्षणात ब्रम्हांड आठवलं

मग हळूच तिनं त्याला

डोळ्यांतूनच हो म्हणलं.

ढग

नाही बरसले तेंव्हा

वारा नाही सुटला तेंव्हा

मोरही नाही दिसला

नाचताना

एक कावळा तेवढा ओरडला

त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास

झाला.



अविश्वासानं त्यानं थरथरत

तिचा हात हातात घेतला

छाती

फाटेस्तोवर एक भला मोठा

मोकळा मोकळा श्वास घेतला

चंद्र नाही हसला

तेंव्हा

मोगरा नाही फुलला तेंव्हा

गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं

म्हणताना

एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला

त्याला मात्र सनईच्या

ओल्या सुरांचा भास झाला.



मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं

संसार-बिंव्सार

करून झालं

चिमणा चिमणीचं एकच पाखरू

दूर विदेशात उडून गेलं

एके

दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत

त्याने तिला एकदाचे विचारलं

"जमलं का

गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?"

तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं

त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं

मग हळूच तिनं त्याला

डोळ्यांतूनच हो म्हणलं

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

एवढ तरी माझ्यासाठी करशील का ??

एवढ तरी माझ्यासाठी करशील का ??

नको देऊस तू माझ्या जीवनात साथ
पण काही पावले तरी माझ्यासोबत चालशील का ??

नको देऊस तू मला माझ्या दु:खात साथ
पण काही क्षण तरी माझ्यासोबत सुखाचे घालवशील का ??

नको देऊस तू माझ्या प्रेमाला होकार
पण काही क्षण तरी माझा विचार करशील का ??

नको होऊस तू माझी .....
पण एकदा तरी माझ्या हातात तुझा हात देशील का ??

एवढ तरी माझ्यासाठी करशील का ??

आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


प्रतेक चेहर्यात मी तुलाच पाहतोय ..,
मोगरा पहिला की तुजा गजरा अथावातोय..,
नुसताच एकांतात बसून..,
हळूच गालात हसून..,
तुला मी वाहत्या पाण्यात पाहतोय ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


हरवलेल्या स्वप्नाना मी पुन्हा शोधतोय..,
नुसत्या अथावानिने कंठ दाततोय...,
हळूच लाजर्या नजरेने एकटक पाहन आठवल..,
हृदयाचा ठोकाच चुकला ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

फुला-फुलतील सुगंध तुजी कथा सांगतोय..,
प्रतेक क्षण तुझा हात मागतोय..,
आजुनही तुझी जगा तशीच आहे..,
वाटते तू आजुनही मज्यपशिच आहेस..,
आहेस ना ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

तुझा तो सुंदर WHITE फ्रोक अथावातोय..,
तुझा तो राग माला पुन्हा पहायचय..,
त्यादिवशी तर तू परिच दिसत होतीस..,
वाटल...कोणाच्याही नजरेत पडू नयेस..,
पण कोणाचीतरी नजर लागलीच...,
का तू इतकी सुंदर दिसतेस ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!
तुझा B'DAY आजुनही अठावातोय..,
WHITE ड्रेसवर्ती निळी फुले..
केसात गुंफलेला लाल गुलाब..
हातात लहानशी घडी..
एकदम अप्रतिम दिसत होतीस..,
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!


त्या दिवशी पावसाने तू चिंब भीजलिस..,
मनातच म्हणालो"टी तुझ्याकदेच पहते"..,
नुसत "HAPPY B'डे म्हनू..
की एखाद सुन्दर गिफ्ट देऊ..,
पन हिम्मतच होत नव्हती ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

देवा..,का रे केलस दूर तिला...,
तिलाही माझ्याशी काहीतरी बोलायाचे होते..,
पण अचानक ती जात होती..,
ती जाते..मला सोडून..मनाला कसतरी समजावल..,
आता मी तिला शेवटचा पाहत होतो..कदाचित..,
खुप रडायचे होते पण तिच्यासमोर नाही...
डोळ्यानी साथ दिली..मी फ़क्त तिच्याकडे पाहताच राहिलो..,
डोल्यानिच एकमेकाना.."I LOVE YOU" म्हणालो..,
आजुनही तुझा तो रुसलेला चेहरा अठावातोय ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!

फ़क्त आता अठावनित जगतोय..,
या वेड्या मनाला दिलासा देतोय..,
कधीतरी ती दिसेल..,
पुन्हा अगदी तशीच हसेल..,
पण तू मला ओलखशील का ग...!
का कोणास ठावुक..,
आज तुझी फारच आठवन येतेय ग...!