''आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही ईतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा..पडुन पडायचच तर ठेच लागून पडू नये. चांगले दोन हजार फूटांवरुन पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला कळेल!"
"खर्च झाल्याचं दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो..."
"सुखाचे क्षण पायाप्रमाणे असतात.
हातात आलेसे वाटतात तेव्हा निसटून गेलेले असतात."
"आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो."
"सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!"
"प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मुल्यमापनाईतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, तर काहींची नंतर!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा