माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

वाटते जेव्हां वळावी वाट ही वळणार नाही
जे कपाळी कोरलेले, ते असे टळणार नाही

शेवटी कळले मनाला जे किती समजावले
आठवांची वेदना आता पुन्हा छळणार नाही

हरवला तो सूर सारे शब्द कोठे सांडले
फूल उमलावे तसे गाणे कधी जुळणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा