माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

मंगळवार, २१ जुलै, २००९

एकदा मी प्रेमाला विचारले
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....


प्रेम म्हणजे काय ? थोडा सांगण्याचा प्रयास केला आहे..अजुन काही सांगण्यसारखे असेल तर सांगा मित्राणो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा