माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

का मी माझे काम विसरलो होतो?
का झालो बदनाम विसरलो होतो...

युगपुरुषाची छबी आगळी झाली,
मी तर माझा राम विसरलो होतो...

लोकांना मी कर्ज वाटले तेव्हा,
मी बापाचा घाम विसरलो होतो...

विश्रांतीने शरीर माझे दुखले
मी बहुधा आराम विसरलो होतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा