माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

खोटेच हे बहाणे सांगून दूर जाणे
क्षणभर हसायचे अन रूसून दूर जाणे.

गुंफायची युगांची वचनात गोड नाती
हळवी शपथ गळ्याची घेऊन दूर जाणे.

मौनातही मनाच्या लाजायची अबोली
नुसतेच मग कळ्यांना चुंबून दूर जाणे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा