मी काय सांगु स्वतःबद्दल..
आतापर्यंतच्या माझ्या छोटयाश्या आयुष्याने मला भरपुर काही शिकवलं त्यामुळे कुठलीही गोष्ट निवडताना डोक दुखेपर्यंत विचार करतो
मैत्रीचं म्हणाल तर मला मैत्री करायला खुप आवडते पण ओढुन-ताणुन मैत्री करण्यात काय अर्थ..जर व्हायची असेल तर आपोआपच होवुन जाते.
माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे पावसात भिजणं आणि नंतर कुडकुडतं चहा-भजी फस्त करण
खुप सारी स्वप्न आहेत मनात, पुर्ण करण्याच्या निर्धारासोबत चाललोय जे होईल बघता येईल
माझं असं मत आहे की जोपर्यंत जो आनंद घेता येतो किंवा एखादा क्षण मनापासुन् जगता येतोय तर जगुन घ्यायचा.
मला स्वच्छंद जगायला आवडतं,जीवनाच्या उंच आकाशात पारव्यागत भिरभिरावसं वाटत.सुर्याच्या समोर उभा राहुन बहरण्य़ाची हिंमत करणारा गुलमोहर मला खुप वेड लावतो.प्रसन्न वाटतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा