माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

बुधवार, २२ जुलै, २००९

जिच्या गालाच्या खळीवर चंद्राचे चांदणे उमलेल तिला मी शोधतो आहे.
बाईकवर बिलगून बसेल, मित्रांसमोर मी मिरवेन तिला मी शोधतो आहे.

माझ्या विनोदाला हसेल, वा काय विनोद! म्हणेल तिला मी शोधतो आहे.
आज मॅच आहे म्हणताच, भेटलो नाही तरी चालेल म्हणणारीला शोधतो आहे.

सारख सारख लाडात येऊन शॉपिंगला चल म्हणणार नाही, तिला मी शोधतो आहे.
माझ्या डोळ्यातल्या स्वप्नांना, ही माझीच तर स्वप्ने म्हणेल तिला मी शोधतो आहे.

मला आवडणारी असेलच पण आईला सुध्दा आवडेल तिला मी शोधतो आहे..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा