जपता आल पाहिजे
अपुलाकिने नात्यासाठी
खपता आल पाहिजे
खपता आल म्हणजे
नात हलूहलू फुलत
एखाद्या नाजुक फुलासारख
नात हलुवार उमलत
फुल उमलून आल की
आपण त्याला जपतो ना!
ते टवटवित राहण्यासाठी
आपण जिवापाड खपतो ना!
असच नातही टवटवित
रहायला पाहिजे
एकमेकात गुरफुटून
वाहायला पाहिजे
कारण वाहता आल म्हणजे
स्वप्न पाहताही येत
नात्यांच्या बेधुंद पावसात
चिंब न्हाहताही येत
अस चिंब चिंब न्हाहल
की नात पुन्हा एकदा फुलत
पुन्हा नाजुक फुलासारख
नात हलुवार उमलत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा